iSanchar.iniSanchar.iniSanchar.in
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • प्रवास आणि पर्यटन
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन आणि चित्रपट
Search
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • प्रवास आणि पर्यटन
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन आणि चित्रपट

QUICK LINKS

© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Sign In
Font ResizerAa
iSanchar.iniSanchar.in
Font ResizerAa
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • प्रवास आणि पर्यटन
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन आणि चित्रपट
Search
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • प्रवास आणि पर्यटन
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन आणि चित्रपट
Have an existing account? Sign In
Follow US
© 2025 iSanchar. All Rights Reserved.
iSanchar » मनोरंजन आणि चित्रपट » मराठी भाषा: अभिजात दर्जा मिळवण्यासाठीची ऐतिहासिक लढाई!
मनोरंजन आणि चित्रपट

मराठी भाषा: अभिजात दर्जा मिळवण्यासाठीची ऐतिहासिक लढाई!

Last updated: May 2, 2025 12:25 pm
By
Pradip V.
ByPradip V.
Follow:
Share
SHARE

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय

केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा ला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे.

Contents
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णयमहाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो : फडणवीसमराठी भाषा मंत्री सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय?नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रियाअभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यांकांना प्रोत्साहन देणारा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची गोड बातमी दिली. “आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या. त्यात कन्नड, तेलुगु, मल्याळम होत्या. नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला. फ्रेम वर्कमध्ये त्या बसल्या आणि त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आता ज्या नव्या भाषा येतील त्यांनाही याच फ्रेमवर्कमध्ये बसवलं जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात…

— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2024

महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो : फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

“हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

धन्यवाद मोदीजी 🙏🙏

आजचा दिवस मराठी मध्य सोनेरी अक्षरांत लिहला जाइल 👍👍

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी…#मायमराठी #अभिजातमराठी pic.twitter.com/8eGnqB1X23

— PallaviCT (@pallavict) October 3, 2024

Know More wikipedia

मराठी भाषा मंत्री सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

सांस्कृतिक तथा मराठी भाषामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आनंदाचा क्षण आहे. अभिमानाचा क्षण आहे. आपली मराठी जगभर पोहोचावी. आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जगातील मराठी माणसापर्यंत पोहोचावी. ही मागणी ३५ वर्षापासूनची आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, तेव्हापासूनची मागणी आहे. महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा ३५० सोहळा आपण साजरा केला. आता मराठी भाषेला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे आनंद आणि अभिमान आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. आम्ही मोदींच्या अभिनंदनाचा ठराव करू. या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांची समिती तयार करून व्याकरण आणि शब्द भंडार वाढवण्याचा प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे. “माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Also Read: थलापथी विजयचा विराट निरोप: त्याचा शेवटचा सिनेमा 69 आणि पुढचा धक्कादायक प्रवास

नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया

मराठी भाषा ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहोत”, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

  • अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
  • अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते.
  • अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

मुंबई: केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीसह बंगाली, आसामी, प्राकृत, पाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून मराठी साहित्यीक, भाषा अभ्यासक आदींनी ही मागणी लावून धरली होती. अखेर या सर्वांचे स्वप्न आज पूर्ण झाले.

अभिजात भाषा हा दर्ज मिळण्यासाठी निकष काय

– संबंधित भाषा प्राचीन असावी आणि त्यातील साहित्य श्रेष्ठ असावे
– भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे लागते
– त्या भाषेला स्वत:चे स्वयंभूपण असावेत
– प्राचीन भाषा आणि तिचे अधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली होती. राज्य सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती देखील नेमली होती. या समितीने ५०० पानांचा अहवाल केंद्राकडे सादर केला होता. ज्यात मराठी भाषा वैशिष्ट्यपूर्ण असून ती अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करते याचे पुरावे देण्यात आले होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरा, पण यामुळे नेमके काय होणार आहे. हा दर्जा मिळाल्यामुळे काय फायदे होणार याबद्दल जाणून घेऊयात…

– मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे.

– सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्व ४५० विद्यापिठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते.

– मराठीतील प्राचीन ग्रंथांना अनुवादित करण्यात सुरुवात होणार

– राज्यातील १२ हजार ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्यानंतर ही सर्व ग्रंथालयांचे सशक्त करण होणार

– मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी, जपण्यासाठी, त्याच्या संवर्धानासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळू शकेल

– अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला मिळेल.

मराठीसह ५ भाषांना अभिजात दर्जा देण्याआधी याआधी तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मळ्याळम या ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. केंद्राच्या आजच्या निर्णयामुळे मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारसह केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळेल.

Also Read: अजंठा लेणी चे अनोखे रहस्य: भारताचा लपलेला खजिना!

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सहा दिवसात कमावले किती जाणून घ्या
सा रे गा मा पा #2024: जजेसच्या निर्णयांनी सोशल मीडियावर खळबळ!
थलापथी विजयचा विराट निरोप: त्याचा शेवटचा सिनेमा 69 आणि पुढचा धक्कादायक प्रवास
मराठी मालिका “ठरलं तर मग” यांनी गाठला ५०० भागांचा यशस्वी टप्पा
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Email Copy Link
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow Us

105.4kFollowersLike
184.2kFollowersFollow
12.5kFollowersFollow

Also Read

वर्क फ्रॉम होम
वर्क फ्रॉम होम करताना पाठदुखीला गुडबाय! या टिप्सने बदला तुमची दिनचर्या!
फॅशन आणि लाइफस्टाइल
महाराष्ट्रातील हे ७ धबधबे पाहिल्याशिवाय तुमची ट्रॅव्हल डायरी अपूर्ण!
महाराष्ट्रातील हे ७ धबधबे पाहिल्याशिवाय तुमची ट्रॅव्हल डायरी अपूर्ण!
प्रवास आणि पर्यटन
कोकणची ही ५ हिडन जेम्स
पावसाळ्यातील कोकणची ही ५ हिडन जेम्स! ९०% टूरिस्ट्सना माहीत नाहीत…
प्रवास आणि पर्यटन
Keep These 5 Ayurvedic Medicines at Home
रोगांना नो एंट्री, ही ५ आयुर्वेदिक औषधी घरात असल्यास रोगांची भीती संपते
आरोग्य आणि कल्याण
World Environment Day Status & Quotes For WhatsApp [New]
शुभेच्छा आणि कोट्स

About Us

iSanachar मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे.आम्ही तुमच्यासाठी आणतोय बातम्यांचा झोन, पुणेरी अंदाजात, थोडं खिदळत, थोडं गंमत करत,पण नेहमीच ताजं-ताजं!

Categories

  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • प्रवास आणि पर्यटन
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन आणि चित्रपट

Quick Links

  • About Us
  • Contact
  • Privacy Policy
  • Disclaimer

Social Links

© 2025 iSanchar. All Rights Reserved.
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?